परंडा /प्रतिनिधी -
राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही म्हणून याच्या निषेधार्थ दि.25 मंगळवार रोजी भाजपाच्या वतीने येथील तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन केले.
 सत्तेत आल्यानंतर आम्ही नुकासग्रस्थ शेतक-यांना हेक्टरी 25000 रु. मदत देऊ आडचणीत आसलेल्या शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देऊन शेतक-यांचा सातबारा कोरा करु, राज्यात महिलांनवरील सर्व अत्याचार थांबवू म्हणुन सत्तेत आलेल्या महाविकासआघाडी सरकारला आता या सर्व आश्वसनाचा विसर पडला आहे. राज्यात नुकसानग्रस्थ शेतकरी हातबल झाला आहे. फसव्य कर्जमापीमुळे शेतकरी कर्जबाजारीच राहिला आहे.महिलांना तर राज्यात दिवसा पेट्रोल टाकून जाळले जात आहे. पण गेंड्याचे कातडं पांघरुण बसलेले राज्य सरकार सुस्त आहे. कुंभकर्णची झोप घेऊन झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी,दिलेल्या अश्वासनाची आठवण करुण देण्यासाठी,शेतकरी शेतमजुराला न्याय मिळवुन देण्यासाठी राज्यभर भाजपाने धरणे अंदोलन सुरु केले आहे. याला अनुसरुण  परंडा भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष राजकुमारपाटील यांच्या नेतृत्वाखाली परंडा तहसिल कार्यलयासमोर धरणे अंदोलनासाठी बसलेल्या भाजपाच्या अनेक कार्यर्त्यांनी धरणे आंदोलनात सहभाग नोंदवून राज्य सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केला.

 
Top