प्रतिनिधी- उस्मानाबाद / तुळजापूर-
उद्धव ठाकरे सरकारने शेतक-यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आश्वासन पूर्ण झाले नाही तसेच राज्यात वाढत्या बलात्काराच्या घटनांच्या निषेर्धात भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले तर जिल्ह्यातील  तुळजापूर शहरात तहसील कार्यालयासमोर कार्यकत्र्यांनी आंदोलन केले.
आंदोलनात एका शेतक-याला बोलविण्यात आले व त्याला कोरा सातबारा सही करून देण्यात आला. यावेळी शेतक-याने मिडीयाशी बोलताना सांगितले की, माझ्यावर कसल्याही प्रकारचे कर्ज नाही, हे काय नाटक करून दाखविले मला माहित नाही, इसी प्रक्रिया दिली. या आंदोलनात माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अॅड. मिलिंद पाटील, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, अॅड. नितीन भोसले, रामदास कोलगे, अॅड. खडेराव चौरे, पूजा देढे, जिल्हा बँकेचे संचालक भारत डोलारे, सतीश दंडनाईक, इंद्रजित देवकते, प्रवीण पाठक, अण्णा पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. बाप-बेटी की सरकार, उध्दवा अजब तुझे सरकार अशा घोषणा आंदोलनात देण्यात आल्या.
तुळजापूर तहसील कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात अनिल काळे, आदेश कोळी, नारायण नन्नावरे, नागेश नाईक, क्रक्रांती थिटे, मिनाताई सोमाजी, महानंद पलवण, श्वस्रड. अंजली साबळे, संगीता कदम, सचिन रसाळ, विजय शिंगाडे, गुलचड व्यवहारे विक्रमसिंह देशमुख, सचिन पाटील, मौली भोसले, विनोद गंगन, अभिजित कदम, नानासाहेब लोंढे, वसंत वडगावे, प्रभाकर मुळे, दत्ता राजमाने, आनंद कंदले आदींनी भाग घेतला होता.
 
Top