तुळजापूर/ प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताची सांगता गुरुवार दि. 27 रोजी काल्याच्या किर्तनाने भक्तीमय वातावरणात झाली.
गोंधवाडी येथे आयोजित हरिनाम सप्तामध्ये दररोज हरिपाठ, प्रवचन संध्याकाळी कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. या हरिनाम सप्ताहाची सांगता सद्गुरू श्री संत तुकाराम महाराज देहूकर यांचे वंशज श्री गुरुवर्य कानोबा महाराज देहूकर च्या काल्याचे कीर्तना ने झाली. कार्यक्रमासाठी वारकरी सांप्रदायिक मंडळ गोंधळवाडी यांनी परिश्रम घेतल. सप्ताची सांगता झाल्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हरिनाम सप्ताह झाल्यानंतर गोंधळवाडी गावाची दिंडी दिनांक 02 मार्च   रोजी श्री क्षेत्र पंढरपूराकडे निघणार आहे.

 
Top