उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहराचे उत्तरे कडील असणारा धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चौकास व उड्डाणपूल यास संत काशीबा महाराज यांचे नाव देण्याचा  ठराव नगरपालिकेत मांडून मंजूर केल्याबद्दल नगराध्यक्ष श्री मकरंद राजे निंबाळकर व उपनगराध्यक्ष  श्री अभय इंगळे यांचा सत्कार करण्यात आला व सर्व नगरसेवकांचेही आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी  नगराध्यक्ष यांच्या हस्ते सदरील ठरावाची रितसर प्रत देण्यात आली.
प्रसंगी पालिकेचे गटनेते युवराज नळे, शिवसेना गटनेते सोमनाथ गुरव, नगरसेवक माणिकराव बनसोडे, गणेश खोचरे, दत्ता पेठे, श्री बाळासाहेब क्षिरसागर, डी के गुरव,भालचंद्र धारूरकर,गोपाळराव नळेगावकर, शंकरराव नळे, महेश मोटे, सुजित तिर्थकर,प्रजित नळेगावकर,प्रशांत खंडाळकर,रवी गुरव ,सुनील तिर्थकर, सांगवे साहेब,प्रमोद बचाटे,अजित मोकाशे,अतुल पाटील, सुजित बिराजदार, अशोक गुरव,विकी गुरव,मोहन गुरव , धीरज तिर्थकर,अनिल पाटील,सुभाष पाटील,नाना तिर्थकर, गणपत तिर्थकर ,संजय उपाध्ये यांच्या सह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.यावेळी संत काशीबा महाराज चौक विकसित करण्यासाठी नगरपालिका सर्व प्रकारे सहकार्य करील असे आश्वासन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिले.

 
Top