उस्मानाबाद/प्रतिनिधी -
येथील रहिवाशी वासुदेव नरहरराव कुलकर्णी (चिखलीकर) यांच  शुक्रवार, 28 फेब्रुवारी रात्री 11 वाजता प्रदीर्घ आजाराने येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज शनिवार, 29 फेब्रुवारी रोजी सकाळी कपिलधार स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक विवाहीत मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उस्मानाबाद शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायीक मोहन व मदन कुलकर्णी, वाशी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी माधव कुलकर्णी तसेच स्टेट बँक ऑफ इंडीयाचे अधिकारी देवीदास कुलकर्णी यांचे ते वडील होत. 
 
Top