उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यातील दिव्यांग बांधवासाठी जिल्हा प्रशासन उस्मानाबाद, रत्न निधी ट्रस्ट मुंबई व एकता फाउंडेशन उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत जयपूर फूट (पाय), हात व कॅलिपर्स चे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
 तरी जास्तीत जास्त गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले असून शिबिरातील नाव नोंदणीसाठी अभिलाष लोमटे 9420771016 व पंकज पाटील 9404421427 यांच्याशी संपर्क साधावा.
 
Top