कळंब /प्रतिनिधी-
जिल्हा परिषद गोलेगाव शाळेतील कु.दयानंद सुरेश कांबळे याने जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत घेण्यात येणा-या ओटीएस (उस्मानाबाद टँलेन्ट सर्च ) परीक्षेत गरुडभरारी घेत तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात नववा क्रमांक प्राप्त केला आहे. त्यानंतर  गटशिक्षणाधिकारी श्री.राहुल भट्टी, विस्तार अधिकारी गिराम, केंद्र प्रमुख कुलकर्णी एस.आर व  कांबळे एम.पी यांनी शाळेत येऊन यशस्वी विद्याथ्र्यांचा व त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक  मेदने मुकुंद, .गणेश कुकडे, श्री.अजय मनगिरे,  तांबारे सर यांचा सत्कार केला.
याचवेळी  शिवानी कागदे, प्राची पिसाळ, निरंजन कागदे ,रामदास काळे , संजय काळे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा ही पुष्प देऊन  सत्कार करण्यात आला.  यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.कल्पना कालिदास कागदे उपाध्यक्ष श्री.अनिल कागदे, मुख्याध्यापक श्री.मुकुंद मेदने आदींची उपस्थिती होती.

 
Top