धाराशिव - 

अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनासह वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा व पान मसाला असा एकुण 28,89,740 रुपये किंमतीचा माल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव जिल्ह्यातील मुरूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पेट्रोलिंग करत असताना अशोक लिलॅन्ड वाहनामधून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना मिळाली. त्यावरुन पथकाने नमूद ठिकाणी जावून सदर वाहन (एमएच 44-यु 2405) थांबवून तपासणी केली. सदर वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला. वाहन चालकास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी नईम रहीम शेख (वय 40, रा. मोमीनपुरा बीड), हुसेन अहमद शेख (वय 30) रा. मोहम्मदीया कॉलनी बीड)  असे सांगितले. पथकाने त्यांच्या ताब्यातील वाहनातून हिरा पान मसाला 64 पोते,  विमल पान मसाला 5 पोते, व्ही-1 तंबाखु एक पोते, महा रॉयल 717 तंबाखु 32 पोते, आओबाजी पान मसाला 15 पोते, रॉयल 220 तंबाखु 14 पोते, हिरा पान मसाला 14 पोते, रॉयल 717 तंबाखु 7 पोते, बॅग, पॉकेटसह अशोक लिलॅन्ड कंपनीचे वाहन असा एकुण  28,89,740 रुपये किंमतीचा माल जप्त करुन दोघा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करुन मुद्देमालासह दोघांना मुरुम पोलीसांच्या ताब्यात दिले.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, पोहेकॉ अश्विन जाधव, दिलीप जगदाळे, विनोद जानराव, अमोल निंबाळकर, हुसेन सय्यद, समाधान वाघमारे, पोना नितीन जाधवर, अशोक ढगारे,  चालक पोहेकॉ संतोष लाटे, अंमलदार प्रशांत किवंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

 
Top