धाराशिव  -

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर होऊन समिती अध्यक्षपदी लिंबराज डुकरे यांची निवड करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जयंती उत्सव पारंपरिक पद्धतीने, उत्साहात व शांततेत साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी निवडीबाबत धाराशिव शहरातील जत्रा फंक्शन हॉल येथे धनगर समाज बांधवांची बैठक पार पडली. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही विविध सामाजिक उपक्रम राबवून पारंपरिक पद्धतीने, उत्साहात व शांततेत साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत यावर्षीच्या जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी लिंबराज डुकरे, उपाध्यक्ष गणेश सोनटक्के, सचिन चौरे, गणेश एडके, कार्याध्यक्ष शुभम शेंडगे,  सहकार्याध्यक्ष कैलास लवटे, सचिव समाधान पडुळकर, सहसचिव महेश मोटे, कोषाध्यक्ष संतोष डुकरे, सहकोषाध्यक्ष सुरेश शिंदे, संघटक दत्तात्रय दाणे, दादा घोडके, सचिन राठोड, शुभम एडके, समाधान लहाडे, अमोल भोजने, शुभम नरटे, नारायण चव्हाण, आकाश कानडे, आण्णा दुधभाते, कृष्णा लांडगे, अभिजित धर्मे तर प्रसिद्धी प्रमुखपदी अमोल मैंदाड व प्रवीण खांडेकर यांची यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.

बैठकीस प्रा.सोमनाथ लांडगे, प्रा. बालाजी काकडे, प्रा. मनोज डोलारे, दिनेश बंडगर, सुभाष मैंदाड, संदीप वाघमोडे, मुकुंद घुले, संतोष वतने, राहुल काकडे, देवा काकडे, गणेश एडके, बालाजी वगरे, श्याम तेरकर, श्रीकांत तेरकर, नरसिंह मेटकरी, प्रशांत लहाडे, विकी अंधारे, नितीन डुकरे, प्रकाश काकडे, हनुमंत डुकरे, बाळू सातपुते, अजिंक्य अडसूळ, महेश काळे, नेमाजी चव्हाण, राजू डुकरे, बालाजी गडदे, निलेश टापरे, बापू चौरे, गणपत काकडे, अभि शेंडगे, बबलू कस्पटे, किशोर डुकरे, संतोष करवर, ओम थोरात व इतर समाज बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते. 


 
Top