उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबादेत वकील व्हॉलीबॉल संघाच्या वतीने राज्यस्तरीय नगराध्यक्ष चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचे दि.21 व 22 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वकील व्हॉलीबॉल संघ व नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्य संकुलासमोर आयोजित या स्पर्धेत प्रथम विजेत्यास 31 हजार रुपये, दुसरे बक्षीस-21 हजार, तिसरे-15 हजार, चौथे-11 हजार, पाचवे-9 हजार, सहावे -8 हजार असे एकूण 16 बक्षिसे व नगराध्यक्ष चषक राहणार आहे. यंदा या स्पर्धेसाठी राज्यभरासह दानवड-कर्नाटक, दिल्ली, राजस्थान येथूनही संघ येणार आहेत. स्पर्धेची नोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत 40 संघांनी नोंदणी केली आहे. याचा व्हॉलीबॉल खेळाडू व क्रीडाप्रेमींनी लाभ घेण्याचे आवाहन वकील व्हॉलीबॉल संघ व नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले आहे.

 
Top