तुळजापूर/प्रतिनिधी-
 तालुक्यातील सलगरादिवटी येथे खंडणी मागणा-या  विरोधात गुन्हा दाखल करून   होत असलेली बदनामी थांबवण्याची मागणी महेश केदार यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात केली आहे.
महेश केदार यांनी म्हटलं आहेकि  आत्माराम जगन्नाथ भरगंडे, मु पो सलगरा दिवटी, यांनी माझ्याकडे म्हणजेच महेश शंकर केदार कडे वैयक्तिक 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. परंतु माझ्या वडिलांचा 20 जानेवारी 2020 रोजी अपघात झाला. त्यांना विशेष दक्षता विभागात ठेवल्याने मला सोलापूर मध्ये दवाखान्यात राहावे लागले. 1 जानेवारी 2020 रोजी त्यांचा दवाखान्यातच मृत्यूही झाला आहे.) त्यानंतर पैसे देण्यास आम्ही असमर्थता दाखवल्याने आमच्यावर खोटे आरोप करत, अनेक ठिकानी आमच्या विरोधात अर्ज केले. तो राग धरून गुन्हे दाखल करत असल्याचे धकमकवत, माझे मंत्रालयात संपर्क असल्याचे सांगत विविध माध्यमातून आरोप केले. तुझा भाऊ राजकारणात आहे, त्याची बदनामी करणार आणि त्याचे भविष्य बरबाद करणार  असल्याचेही सांगितले होते.  या प्रकरणी योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 
Top