वाशी/प्रतिनिधी-
संतमिरा पब्लिक  इंग्लिश स्कुलचे  वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यां
नी विविध कला प्रदर्शन, नृत्य करून पालकांची तसेच शिक्षक, प्रेक्षकांची मने जिंकली. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन तहसीलदार डॉ.संदीप राजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राहुल भट्टी, कांबळे सर, पत्रकार नेताजी नलवडे , प्रा.डॉ.दैवशाला रसाळ , मुख्याधापक सोनल जैन यांची प्रमुख उपस्थिती होती . प्रारंभी   दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट खेळाडूंचा प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व पदक देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे डॉ.संदीप राजपुरे यांनी यावेळी आपले विचार मांडले व मुख्याधापक सोनल जैन यांनी शाळेच्या प्रगती विषयी मार्गदर्शन केले व शाळेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. यावेळी विद्याथ्र्यांनी नाटक व गाण्याच्या माध्यमातून सादरीकरण करून प्रेक्षकांची व पालकांची मने जिंकली. सूत्रसंचलन अमृता डोईफोडे व किशोर खुटे यांनी तर आभार प्रदर्शन रोहिणी डोरले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 
Top