उस्मानाबाद/प्रतिनिधी-
औदयोगिक प्रशिक्षण संस्था,उस्मानाबाद येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन उद्योजक श्री. देशमाने (वेणू टाईल्स), यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा प्राचार्य औदयोगिक प्रशिक्षण संस्था श्री. रविशंकर सावळे हे होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकाला राष्ट्र भावना, देशभक्ती व सुप्त गुणांचा विकास करण्याबद्दल अनमोल मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. कुमार स्वामी, श्री.चंदन भंडगे, श्री. प्रा.अर्जुन जाधव हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक गटनिदेशक श्री. बी. एच. भोसले यांनी केले. तसेच सूत्रसंचालन गटनिदेशक श्री. के. जी. जोशी यांनी केले, तर कार्यक्रम अधिकारी श्री. बी. बी. जाधव यांनी आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास गटनिदेशक श्री. एम. जी. महाडिक, श्री. के. डी. नाईक, श्री. जी. एम. कोरे, श्री. एस. टी. राऊत व सर्व कर्मचारी, स्वयंसेवक व प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग नोंदवून राष्ट्रगीताने उद्घाटन सोहळयाची सांगता झाली.

 
Top