उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 येथील श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात सुरु असलेल्या भागिरिथी युवा महोत्सवात विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सदस्या सौ.प्रेमाताई पाटील, डॉ.मंजूळा पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य सुधीर पडवळ, उपप्राचार्य साहेबराव देशमुख, उपप्रशासकीय अधिकारी संतोष घार्गे, भागिरिथी युवा महोत्सवाचे संकल्पक अभिराम पाटील, कला विभाग प्रमुख नंदकुमार नन्नवरे यांची प्रमुख उपस्थिती होती होती.
मुलांच्या पंखांना बळकट करण्यासाठी लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये आपली संस्कृती आणि परंपरा रुजविणे महत्वाचे आहे. आपल्या समृद्ध परंपरेचा वारसा जपण्यासाठी तो गोष्टीच्या, नाटकाच्या व इतर अनेक गोष्टींतून मांडला गेला पाहिजे. यातूनच तो नवीन पिढीपर्यंत पोहचून मग पुढे जोपासला जाईल. अशा भावना सुधीर पाटील यांनी व्यक्त केल्या.
आपल्या राज्याची संस्कृती या थीम वर नृत्य,नाटिका अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावेळी करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पारंपरिक कलाप्रकारांसोबतच चित्रपट गीते, रिमिक्स, वेस्टर्न सॉग्सवर नृत्य सादर केले. त्याचप्रमाणे  महाराष्ट्राची लोककला लावणी, कोळीगीत, गोंधळीगीत, भारुड आणि  अंधश्रद्धेला छेद देणारी भोंदूबाबा ही संगीत लघुनाटिका सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. 'दार उघंड बये.. या भारुडाला अन् नटले मी तुमच्यासाठी.., इचार काय हाय तुमचा.. या लावण्यांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित सामाजिक एकोपा सांगणारे जिजाऊचा तो एक शिवा, भिमाईचा हा एक भीमा.. हे गीत कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरले. उस्मानाबादचा प्रसिद्ध नृत्य कलाकार शुभम खोत याने मी मेनका उर्वशी.. ही बहारदार लावणी सादर करुन कार्यक्रमाची रंगत अजून वाढवली. यावेळी कलाकारांनी केलेली आकर्षक वेशभूषा, मनमोहक सादरीकरण यातून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महोत्सवात पार पडलेल्या विविध क्रक्रीडा स्पर्धा, आनंद मेळा, पाककृती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदी स्पर्धांत यश संपादन केलेल्या गुणवंत खेळाडूंचा प्रशस्ती पत्रक आणि सन्मान चिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रवींद्र माने तर आभार प्रा.सुर्यकांत कापसे यांनी व्यक्त केले. या स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रा.मनोज डोलारे, प्रा.विवेक कापसे, प्रा.विनोद आंबेवाडीकर, प्रा.पांडूरंग गर्जे, प्रा.प्रसाद माशाळकर, प्रा.मोहन शिंदे, प्रा.पिंटू गवारे, प्रा.कैलास कोरके, प्रा.दगडू घोडके, प्रा.राज भोसले, प्रा.दिपक पुजारी, प्रा.शरद सदाफुले, प्रा.जीवन पाटील, प्रा.महेंद्र शिंदे, प्रा.मेघमाला देशमुख, प्रा.प्रीती मेटे, प्रा.प्रगती वाघमारे, प्रा.सरोज साळुंके, हातलाई कुस्ती संकुल आदींनी अथक परिश्रम घेतले.
 
Top