उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 येथील श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात सुरु असलेल्या भागिरिथी युवा महोत्सवात आज आनंद मेळावा उत्साहात पार पडला. आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्था सदस्या तथा  नगरपरिषद गटनेत्या सौ.प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मंजूळा पाटील, उपप्रशासकीय अधिकारी संतोष घार्गे, पर्यवेक्षक प्रा तानाजी हाजगुडे यांची उपस्थिती होती.
आपल्या उद्घाटनपर भाषणात सौ.प्रेमाताई पाटील यांनी मुलांच्या विविध गुणांचे अवलोकन करण्याच्या हेतूने आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान व्हावे, त्यांचे व्यावसायिक कौशल्यांचा विकास होऊन व्यक्तिमत्व विकासात भर पडावी. हा आनंद मेळावा आयोजनामागे उद्देश असतो, असे प्रतिपादन केले.
आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वत: बनवलेल्या विविध चवीष्ट खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले होते. खाद्य पदार्थांच्या विक्रिमधून विद्याथ्र्यांनी मोठी आर्थिक कमाई केली. आनंद मेळाव्यात वेगवेगळ्या पदार्थांचे 55 ते 60 स्टॉल उभारण्यात आले होते. विद्याथ्र्यांंनी विविध खाद्यपदार्थांची विक्री करुन व्यवहाराज्ञान घेतले. या मेळाव्याच्या माध्यमातून विद्याथ्र्यांच्या अंगी व्यावसायीक कौशल्य वाढीस चालना मिळाली. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, मुख्याध्यापक सुधीर पडवळ, शिक्षक-शिक्षिका यांनी विद्याथ्र्यांच्या व्यवहार चातुर्याचे कौतुक केले.
दुपारच्या सत्रात संगीत खुर्ची, मटका फोडणे, पोत्यातील उड्या, लिंबूचमचा, टांगलेली जिलेबी खाणे असे अनेक मनोरंजक खेळ घेण्यात आले. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचा व मनोरंजक खेळांचा मनमुराद आनंद लुटला.
या आनंद मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रा.मेघमाला देशमुख, प्रा.प्रीती मेटे, प्रा.अनिता तुंगीकर, प्रा.सरोज साळुंके, प्रा.प्रगती वाघमारे, प्रा.दिपाली बंडगर, प्रा.लक्ष्मी भोसले,  प्रा.शुभांगी माने, प्रा.शिवकन्या सुरवसे,  प्रा.सुप्रिया मिरगणे, प्रा.कविता वडगणे, प्रा.ज्योती शिंदे, प्रा.सोनाली कोल्हे आदींनी अथक परिश्रम घेतले.
 
Top