उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तालुक्यातील केशेगाव येथे मागील भांडणाच्या रागातून गुणवंत भैरू काळे यांच्या शेतातील हरभरा पिकांचे नुकसान करण्यात आले. ही घटना केशेगाव येथे ५ फेब्रुवारी रोजी घडली.
या प्रकरणी बेंबळी पोलिस ठाण्यामध्ये ६ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये म्हटले आहे की, विठ्ठल दशरथत कोळगे, दत्तू दशरथ कोळगे, शिवाजी दशरथ कोळगे, रूक्मिणी शिवाजी कोळगे यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून शेतातील हरभरा पिकाचे नुकसान केले. या प्रकरणी पुढील कार्रवाई पोलिस करीत आहेत.

 
Top