उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 कै. चंद्रकलादेवी पाटील इंग्लिश स्कूल  येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठया उत्साहात संपन्न झाले .  कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी,  पं.स.सदस्या   सुरेखा कदम, कोळेवाडीचे सरुंच सुरजितसिंह राऊत , माजी तंटामुक्त अध्यक्ष मंगेश फंड, ग्रामसेवा संघाचे नरहरी बडवे, बालाजी अडसूळ, रत्नमाला पिंपळे, बालाजी आंधळे उपस्थित होते. तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. संमेलनामध्ये लोकगीते, कोळीगीते, गोंधळी गीते, नाटिका यांचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंजली फंड, सुप्रिया चव्हाण, रूपाली पांचाळ, सुनिता पांचाळ, अश्विनी रितापुरे ,अर्चना शेळके,  सुप्रिया पाटील, दिदी डक, प्रतिभा नाईकवाडी, सुरेखा पिंपळे, नामदेव  गायके, गोपाळ थोडसरे, बाळासाहेब घेवारे, मयूर लोंढे, अमर गोडसे, सागर जगताप,  नवनाथ पांचाळ, सारंग पिंपळे  ,केशव सलगर आदींनी परीश्रम घेतले.

 
Top