उस्मानाबाद/प्रतिनिधी-
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये देशात सध्या प्रदुषण मानके बीएस-४ चालू आहेत. ३१ मार्च २०२० नंतर कोणत्याही बीएस-४ मानके असलेल्या वाहनांची नोंदणी केली जाणार नाही, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी दिली.
ज्या वाहनधारकांकडे बीएस-४ वाहनाची नोंरणी करने प्रलंबित असेल तर २० मार्च २०२० रोजी त्वरीत नोंदणी करून घ्यावे, संगणकीय वाहन प्रणालीवर कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्च नंतर केवळ बीएस-६ वाहनांच्या  मानकांचीच नोंदणी होणार आहे.गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तांवर गाडी घेणा-या वाहनधारकांनी या संदर्भाची नोंद घ्यावी. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात संगणकीय प्रणालीत होणारा बदल पाहता वाहन वितरक व वाहन मालकांनी याची नोंद घेण्याची आवाहन करण्यात आले आहे.

 
Top