उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबादेत वकील व्हॉलीबॉल संघाच्या वतीने राज्यस्तरीय नगराध्यक्ष चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचे शुक्रवार दि.21 व 22 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वकील व्हॉलीबॉल संघ व नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या स्पर्धा  उद्घाटन कार्यक्रमास खा.ओमराजे निंबाळकर, आ.सुजितसिंह ठाकूर, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ.कैलास पाटील, जीवनराव गोरे, आ. चौगुले उपस्थित राहणार आहेत. यावेळी सिनेअभिनेत्री रूपाली भोसले, सिनेदिग्दर्शक निलेश पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यंानी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्य संकुलासमोर सायंकाळी ६ वाजता स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम होत आहे. आयोजित या स्पर्धेत प्रथम विजेत्यास 31 हजार रुपये, दुसरे बक्षीस-21 हजार, तिसरे-15 हजार, चौथे-11 हजार, पाचवे-9 हजार, सहावे -8 हजार असे एकूण 16 बक्षिसे व नगराध्यक्ष चषक राहणार आहे. यंदा या स्पर्धेसाठी राज्यभरासह दानवड-कर्नाटक, दिल्ली, राजस्थान येथूनही संघ आले आहेत. स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणुन उस्मानाबाद जनता बैंकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, उपनगराध्यक्ष अभय इंगळे आदी उपस्थित राहणार आहेत.
राज्यस्तरीय नगराध्यक्ष चषक  व्हॉलीबॉल स्पर्धेचा लाभ नागरिकांनी, क्रीडाप्रेमींनी घेण्याचे आवाहन वकील व्हॉलीबॉल संघ व नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले आहे.

 
Top