तेर/प्रतिनिधी-
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त तेर ता उस्मानाबाद येथील महाराष्ट्र संत विद्यालयात दि. 29 जानेवारी ते 4 फेबु्रवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर सप्ताह सोहळ्याची मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी मिरवणुकीने सांगता झाली.
 प्रारंभी सेवानिव्रत्त मुख्याध्यापक एस.बी. नाईकवाडी , विश्वनाथ अबदारे , नारायण भंडारे यांच्या हस्ते कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष राहुल भोरे , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबलू मोमीन , सोसायटीचे चेअरमन रियाज कबीर , अॅड बालाजी भक्ते ,नरहरी बडवे, केशव सलगर , तानाजी बंडे , तानाजी पिंपळे , शाहबाझ मुलांनी , माधव मगर ,राजेंद्र माने,  अशोक डंक , हनुमंत पवार , मयुर लोंढे आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी कर्मवीर सप्ताह निमित्त  लेझीम व टिपरी पथकाद्वारे विविध प्रकारच्या कलाविष्काराचे सादरीकरण करत गावांतून भव्य जनजागरण फेरी  काढण्यात आली.
 विशेष म्हणजे या जनजागरण फेरीचे खास आकर्षण ठरले " मोबाईल फोनच्या आती वापरामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम दाखवणारा" चित्ररथ आकर्षणाचा विषय ठरला. यावेळी मुख्याध्यापक एस एस बळवंतराव , एम. एन .भंडारे  , डी. डी. राऊत, एम. एल. कांबळे, ए. बी. वाघीरे, आर.एम.देवकते, एम.एन.शितोळे, ए.एन.रणदिवे , एस. यू. गोडगे,  ए.डी.राठोड , हरी खोटे, एम.एन.नंरसिगे, ए. बी. नितळीकर, एस.डी. घाडगे , महंमद बागवान , सतिश भालेराव , ज्ञानेश्वर काळे , एस .आर. पाटील , एस. एस. सामटे आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी सप्ताह सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
 
Top