
ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मधील इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्याथ्र्यांसाठी, क्षेत्रभेटीचे आयोजन इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष मोरजकर सर व सचिव सौ.मोरजकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
या क्षेत्रभेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी (कात्राबाद तह. परंडा ) येथील प्रगतशील शेतकरी श्री.समाधान देवकर यांच्या शेतातील शेततळे व त्यावर आधारित मत्स्यव्यवसाय या उद्योगाची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.त्यांनतर विद्याथ्र्यानी वनभोजनाचा देखील आनंद घेतला. यावेळी एकूण 78 विद्यार्थी व त्यांचे वर्ग शिक्षक उपस्थित होते.