
शिवजयंतीचे औचीत्य साधुन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या संकल्पनेतुन जिजामाता कन्या सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात जन्मलेल्या कन्येस नगर परिषद वतीने पाच हजार रुपये फिक्स डीपाँझिट टाकण्यात येणार असुन यामुळे या कन्येला भविष्यात छोटीसी अर्थिक मदत होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत धनादेश वितरण करण्यात आले.
यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, बापुसाहेब कणे, विजय कंदले, पंडीत जगदाळे , औदुंबर कदम, विनोद गंगणे, शांताराम पेंदे, अभिजीत कदम, माऊली भोसले, नानासाहेब लोंढे यांची उपस्थिती होती.