उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जि. प.मा.उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेर ग्रामपंचायतच्या वतीने गावात विकास कामांचा धडाकाच सुरू करण्यात आला आहे. आज विविध विकास कामांचे भूमिपूजन सौ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील  नागरिक व महिलांच्या भेटी घेवून संवाद साधत त्यांच्या समस्या व प्रश्न जाणून लोकहिताचे विकास कामे हाती घेण्याच्या सूचना त्यांनी ग्रामपंचायतला दिल्या.
गोदावरी परिसरातील रस्त्याचा प्रश्न खूप दिवसांपासून प्रलंबित होता. आमदार निधीतून रु.10 लक्षची तरतूद करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. या कामाचे व संत विद्यालय जवळील वस्तीतील विंधन विहिरीचे लोकार्पण तसेच ग्रामपंचायत निधीतील पालखी रस्ता, सुलतान चौक व मातंग वस्ती येथील विंधन विहिरींचे भूमिपूजन सौ. अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कामांचा पाठपुरावा करून कामे मार्गी लावल्याबद्दल परिसरातील नागरिक व महिलांनी  सौ. पाटील यांचा सत्कार केला व त्यांचे आभार व्यक्त केले. तेर गावातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन यावेळी सौ. पाटील यांनी दिले.
कार्यक्रमास सरपंच श्री.नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच श्री.बाळासाहेब कदम, श्री.भास्कर माळी, श्री. विठ्ठल लामतुरे, श्री.बबलू मोमीन, श्री.बालाजी पांढरे, श्री.बापू नाईकवाडी, इर्शाद मुलाणी, मंगेश पांगरकर, गणेश फंड, सुमेध वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ, महिला भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top