तुळजापूर/प्रतिनिधी-
 तिर्थक्षेञ तुळजापूरच्या उपजिल्हारुग्णालय येथील वैद्यकीय अधिकार वर्ग 1 पदी डॉ. प्रविण सुभाषराव रोचकरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर रोचकरी यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर त्यंाचे विविध सामाजिक संघटनाच्या वतीने भव्य सत्कार करून स्वागत करण्यात आले.
डॉ. सुभाष रोचकरी स्थानिक असल्याने येथील कर्मचारी वर्ग तणावमुक्त काम करेल असा आशावाद व्यक्त होत आहे. येथील उपजिल्हारुग्णालय शंभर खाटांचे आहे.  125 च्या आसपास कर्मचा-यांचा स्टॉप आहे.  तुळजापूर शहर हे तिर्थक्षेञ असल्याने येथे जवळपास रोज ५०० रुग्णांची ओपीडी चालते तसेच रोज ५०  रुग्ण अँडमिट होतात .महिन्याला येथे दोनशे  बाळतपणाचे केसेस दाखल होतात. डॉ. प्रविण रोचकरी हे स्थानिक असल्याने त्याच्या नियुक्ती मुळे सर्वच रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळेल,असा आशावाद रुग्णामधुन व त्याच्या नातेवाईकांमधून मधुन व्यक्त केला जात आहे.
 
Top