परंडा /प्रतिनिधी-
प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजने अंतर्गत तेर येथील कै.दिलीप विठ्ठल भातभगे  यांचा रक्कम रू 200000/- (दोन लाख रुपये) चा विमा महाराष्ट्र ग्रामीण बँक, तेर शाखेने पाठपुरावा करून मंजूर करून दिला. ठेवीचे पत्र त्यांच्या वारस उषा दिलीप भातभागे यांना शाखा व्यवस्थापक  एन .ए .मारवाडकर  यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी  एस .एस. सावंत , वी. जे .कांबळे , लाला शिंदे उपस्थीत होते. यावेळी सर्व ग्राहकांनी बँकेच्या प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, अटल पेन्शन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाखाधिकारी एन.ऐ. मारवडकर यांनी केले.

 
Top