नळदुर्ग/प्रतिनिधी-
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत चला करुया क्षय रोग मुक्त गाव या संकल्पने नुसार नळदुर्ग येथील नॅशनल प्राथमिक मराठी शाळेमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमीत्ताने घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा कार्यक्रमाला विदयाथ्र्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
तुळजापूर तालुका अरोग्या अधिकारी यांच्या मार्फत हा कार्यक्रम नॅशनल प्राथमिक व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आला होता. यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने शाळेतील विदयार्थ्यांना क्षय रोगा संबंधी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तालुका आरोग्य पर्यवेक्षक महेश पाठक व श्रीमती सुमन शरणप्पा फुले यांनी मार्गदर्शन केले. तर शाळेमध्ये क्षय रोगा विषयी प्रश्न मंजूषा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाळेतील सुमारे पन्नास विद्याथ्र्यांनी या प्रश्नमंजूषा कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या प्रश्न मंजूषा स्पर्धेत प्रथम  क्र. दिक्षा दिलीप शिंदे, व्दितीय क्र. बिलाल अक्तर शेख, आणि तृतीय क्र.श्रीरंग संजय बेले या विद्याथ्र्यांना सन्मान पत्र व रोख रक्कमेचे पारितोषीक देवून त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. सुमन फुले यांनी करुन आभार मानले. दरम्यान या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक बांधव व शाळेचे मुख्याध्याक यांच्यासह शाळेतील सर्व विदयार्थी उपस्थीत होते.

 
Top