उमरगा/प्रतिनिधी
 उमरगा येथील स्वरसाधना संगीत क्लासेसच्या विद्याथ्र्यांंनी संगीत परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या नाव्हेंबर-डिसेंबर 19  अंतर्गत कै नानाजकर स्मारक संगीत विद्यालयात या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
या परिक्षेत प्रवेशिका प्रथम गायन कु.निधी मुरली जाधव, मयुरी बाळकृष्ण शिंदे, श्रुती कृष्णमूर्ती कुलकर्णी, पद्मजा विनोद देवरकर, चिरंजीवी संतोष सुतार, सर्व  प्रवेशिका प्रथम  हार्मोनियम वादन श्राविका गोळप्पा,  कांबळे, धु्रवी संतोष सोमवंशी, प्रवेशिका पूर्ण सुकृता कृष्णमूर्ती कुलकर्णी, मध्यमा प्रथम हार्मोनियम वैभव दशरथ कोकणे सर्व विद्याथ्र्यांन प्रथम श्रेणी प्राप्त केली असून गुणवंत विद्याथ्र्यांचेे कौतुक होत आहे. विद्याथ्र्यांना शिक्षिका गौरी कांबळे, प्रा. मुरली जाधव, केंद्र संचालक सोमशंकर आगसे, संतोष हारके आदींनी अभिनंदन केले आहे.

 
Top