नळदुर्ग/प्रतिनिधी-
 महाराष्ट्र शासन साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य व साप्ताहिक विवेकचे उपसंपादक श्री रविंद्र गोळे यांनी लिहिलेल्या ‘सुह्यदयी’या पुस्तकाचे प्रकाशन यमगरवाडी (ता.तुळजापूर)  येथे  माजी मंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
एकलव्य विद्या संकुल येथे महाशिवरात्र स्नेहमेळाव्यात आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी एकत्रीकरणात या पुस्तकाचे विशेष प्रकाशन करण्यात आले. श्री.रविंद्र गोळे यांची आज पर्यंत 35 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी पासून अलिप्त राहून काम करणा-या सहा व्यक्तींच्या जीवनकार्याचा परिचय त्यांनी या पुस्तकात करून दिला आहे.
सदरील पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमास भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी विवेक आयाचीत लेखक रविंद्र गोळे, तपस्वी चॅरीटेबल ट्रस्टचे अॅड. मिलिंद पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
 
Top