उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद व कळंब या दोन तालुक्यातील शेतक-यांच्या तुती लागवडीच्या अनुदानापोटी २ कोटी  १७ लाख ८६ हजार रूपये प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत.
याबाबत खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत या दोन तालुक्यात सन २०१८-१९ मध्ये मोठ्या प्रमाणात शेतक-यांनी तुतीची लागवड केली होती. परंतु, तहसील कार्यालयाकडे जमा केलेली २ कोटी १७ लाख ८६ हजार रूपयांची बिले ऑनलाईन पोर्टलला अपलोड न केल्यामुळे रखडलेली होती. यासाठी खा. ओमराजे निंबाळकर व आ.कैलास पाटील यांनी मनरेगा आयुक्त व जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
अखेर ४ फेब्रुवारी रोजी सदर थकीत कुशल देयके आयुक्त (नागपूर) यांनी जिल्हा रेशीम विकास अधिकारी यांच्या खात्यावर प्रदान केली असल्याचे सदर प्रसिध्दीपत्रकात नमुद करण्यात आले आहे.

 
Top