कळंब /प्रतिनिधी-
राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे बदलीचे धोरण ठरवताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाला विश्वासात घेऊनच नविन बदली धोरण जाहीर केले जाईल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय शिष्टमंडळास दिला, असल्याची माहीती प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.
राज्यशासनाने जिल्हापरिषद शिक्षकांच्या बदलीचे नविन धोरण ठरवण्यासाठी पुण्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी मा.आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्य असलेला अभ्यासगट निर्माण केला आहे.या अभ्यासगटाचा अहवाल येण्यापुर्वी शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने दि.18 फेब्रुवारी रोजी ग्रामविकास मंत्री  हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन बदली धोरणात कोणता बदल असावा व कशाचा समावेश असावा या बाबत   चर्चा करण्यात आली. या चर्चेच्या वेळी ना.मुश्रीफ यांनी अभ्यासगटाचा अहवाल शासनास प्राप्त झाल्यानंतर  शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय पदाधिका-यां समवेत चर्चा करुनच नविन बदलीचे धोरण जाहीर करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
या शिष्टमंडळात शिक्षक नेते संभाजीराव थोरात , प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे सरचिटणीस आप्पासाहेब कुल,संपर्क प्रमुख मोहन भोसले  कार्याध्यक्ष अंबादास वाजे, नाशिक विभागीय अध्यक्ष आबासाहेब जगताप , बाळासाहेब झावरे, शेख इसाक पटेल, बाबुराव पालकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top