परंडा/ प्रतिनिधी-
येथील कल्याण सागर अर्बन कॉ-ऑपरेटीव्ह बँकेच्या संचालक मंडळाची तातडीची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत चेअरपदी डॉ.मंदार पंडीत यांची निवड करण्यात आली.
 संचालक मंडळाची बैठक सहायक निबंधक संजय निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत संचालकांची विचार विनिमय होऊन बँकेच्या चेअरमनपदी डॉ.मंदार पंडीत यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर संस्थापक आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी  नूतन चेअरमन डॉ.पंडीत यांचा सत्कार केला तसेच बँकेचे व्हाइस चेअरमन राजेंद्र चौधरी, मावळते चेअरमन तथा संचालक अजित पाटील, महावीर काशीद,नय्युम कळंबकर, अॅड.भालचंद्र औसरे, चंद्रकांत काकडे, हनूमंत वीटकर, आशपाक डोंगरे, आप्पा शिंदे यांनी ही मंदार पंडीत यांचा सत्कार केला. दरम्यान कल्याण सागर बँकेच्या संचालक व कर्मचारी यांच्या वतीने संस्थापक आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा वाढदिवासानिमित्त सत्कार करण्यात आला.
 
Top