कळंब/प्रतिनिधी-
पञकार दिपक माळी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणा-यां आरोपींवर पञकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा यासाठी कळंब तालुका पञकार संघाच्या वतीने तहसीलदारांना व कळंब पोलीसांना निवेदन देण्यात आले आहे.
कळंब येथील पत्रकार दिपक माळी यांच्यावर येरमाळा रोडवरील हसेगाव जवळील निसर्ग राजा धाब्याजवळ दि.23 रोजी सायंकाळी 6 वाजता शफिक मोमीन,महेबुब शेख व इतर दोन जनांनी येवुन शिविगाळ करत धाब्यामधील खुर्चा व दगडांनी मारहाण केली आहे. पञकारांवर हल्ला करणा-या या समाजकंटकावर पञकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा यासाठी कळंब तालुका पञकार संघाच्या वतीने तहसीलदारांना व कळंब पोलीसांना निवेदन देवुन आरोपींना तात्काळ अटक करूण कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर,विश्वस्त सतीश टोणगे,पञकार ज्ञानेश्वर पतंगे,माधवसिंग राजपुत, शितलकुमार घोंगडे,रमेश अंबीरकर, बालाजी सुरवसे, अमर चोंदे, ओंकार कुलकर्णी, राजे सावंत, शिवप्रसाद बियाणी, नरसिंग खिचडे यांच्यासह शिवसंग्रामचे अविनाश खापे, संभाजी ब्रिगेडचे राहुल चोंदे आदी पञकार उपस्थित होते. सर्व आरोपींना तात्काळ अटक करून लवकरात लवकर गुन्हे दाखल करा अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा कळंब तालुका पञकार संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

 
Top