तुळजापूर/प्रतिनिधी-
तिर्थक्षेञ तुळजापूर येथे माघ पोर्णिमेनिमित्त रविवार दि.9  रोजी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ भाविकांनी मोठी गर्दी केली होती. देवी भक्तांनी श्री तुळजाभवानी मातेस अभिषेक करून कुलधर्म कुलाचार करून दर्शन घेतले.
पौर्णिमेच्या दिवसी मंदीरातील चांदी दरवाजा होमकुंडावर शेतक-यांना आपल्या शेतातील आणलेल्या ज्वारीचे धाट व गव्हाचा लोंब्या लावल्या होत्या. सांयकाळी देवीजीस भाविकांची अभिषेक पुजा झाल्यानंतर देवीस वस्ञोलंकार घालण्यात आला. राञी मंदीर प्रागणात छबिना काढण्यात आल्यानंतर माघ पौर्णिमेच्या  धार्मिक विधीची सांगता झाली.

 
Top