कळंब/प्रतिनिधी -
तालुक्यातील शिराढोण येथील अटल बिहारी वाजपेयी अंतरराष्ट्रीय शाळेत कार्यरत असणा-या शिक्षकांच्या कारचा मुरुड येथून शाळेस येत असताना दि.26 रोजी सकाळी 11 च्या सुमारास नायगाव जवळ अपघात झाला. या अपघातात शाळेतील आदर्श शिक्षिका सौ.ज्योती माकूडे (35) यांचा मृत्यू झाला तर इतर शिक्षक व शिक्षीका जखमी झाले आहेत.
नेहमी प्रमाणे शाळेतील सहशिक्षक राजेंद्र मचाले यांच्या आल्टो कार मधुन कांतीलाल गणगे, शितल जाधव, मंजूषा पवार व ज्योती माकूडे हे सर्व शिक्षक नोकरी साठी कार्यरत असणा-या शिराढोण येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी अंतरराष्ट्रीय शाळेसाठी निघाले होते. मुरुड शिराढोण या मार्गावर नायगावच्या जवळ आल्यानंतर अचानक समोरुन एक वृध्द पायी रस्ता ओलांडत असताना त्या वृध्दास वाचवण्यासाठी कार चालवत असलेले शिक्षक मचाले यांनी ब्रेक दाबले. कार वेगात असल्याने ब्रेक दाबताच गाडी रस्त्याच्या खाली उतरुन पलटली व एका झाडास जावून आदळली. या घटनेत कार मध्ये पाठीमागे बसलेल्या शिक्षीका ज्योती माकुडे यांच्या मानेला जबर मार लागला होता तर इतर दोन महिला शिक्षीकांनाही गंभीर दुखपत झाली. कार चालवत असलेले शिक्षक व त्यांच्या सोबत बसलेले शिक्षक यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनास्थळी नायगाव व परीसरातील नागरिकांनी अपघात झालेल्या कार मधुन जखमींना बाहेर काढले व मुरुड येथील रूग्णालयात दाखल केले. रूग्णालयात दाखल झाल्यानंतर शिक्षीका ज्योती माकोडे यांना मृत घेाषीत करण्यात आले. यापैकी दोन महिला शिक्षीकांना लातूर येथे खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून इतर शिक्षकांवर मुरुड येथे उपचार करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थी आपल्या प्रिय असलेल्या शिक्षिका माकूडे यांची वाट पाहत होते. अचानक अपघात झाल्याची माहिती शाळेत समजताच शाळेला सुट्टी देवून शाळा बंद करण्यात आली व सर्व शिक्षक घटनास्थळी दाखल झाले.