उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद येथील सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे  कार्यालय नांदेड येथे स्थलांतरीत करण्यात येवू नये या मांगणीचे निवेदन आ. कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन दिले.
 सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे कार्यालय उस्मानाबाद येथून नांदेड येथे स्थलांतर करण्याच्या हालचाली शासन स्तरावर होत आहेत. अशा प्रकारे कार्यालयाचे स्थलांतर झाल्यास उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जनतेच्या आक्रोशाला सरकारला सामोरे जावे लागेल. या संदर्भात दि. 05 फेब्रुवारी  2020 रोजी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती सांगतिली व  त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन जिल्ह्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.

 
Top