उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 भूम तालुक्यातील वालवड केंद्राचे मुख्याध्यापक श्री.भगवान पिंगळे यांचा सेवानिवृत्ती बद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला. भगवान पिंगळे यांनी गेली 35 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य केले असुन त्यांनी अनेक विद्याथ्र्यांना घडवले आहे. वाल्हा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत निरोप समारंभाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती श्री.धनंजय सावंत हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्री.शिवाजीराव भडके उपस्थित होते. यावेळी त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामाला उजाळा देण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी श्री.बालाजी गुंजाळ, श्री.प्रवीण खटाळ, श्री.बापूसाहेब अंधारे, श्री.दत्तात्रय मोहिते, ह.भ.प.रवी महाराज सामनगावकर, श्री.परमेश्वर हुके, श्री.विलास मोरे श्री.जाधव विस्ताराधिकारी श्री.वाळके, केंद्रप्रमुख श्री.बेळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाल्हा गावच्या प्रथम नागरिक सौ.संजीवनी धनंजय चोरगे, श्री.भाऊसाहेब शेळवणे, श्री.दिपकराजे शेळवणे, श्री.निलेश शेळवणे, श्री.कृष्णा भोरे, श्री.युवराज शेळवणे श्री.कैलास मोहिते, ज्ञानदेव साळूंके, श्रीमती.जयश्री मुळे व श्रीमती.अर्चना खोसे  इत्यादी उपस्थित होते. यावेळी श्री.लहु गायकवाड मनोगत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.अमोल जगताप यांनी केले तर आभार श्री.बब्रुवाहन भोसले यांनी मानले.
 
Top