उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तुळजापूर येथे आयोजित आरोग्य तपासणी व उपचार शिबिरात 700 महिला, पुरुषाची तपासणी करून उपचार करण्यात आले.
प्रामुख्याने हृदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग यासह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले. मोफत औषधेही दिली. शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी टीपरसे, डॉ. प्रवीण रोचकरी, नगरसेवक विजय कंदले, सचिन रोचकरी, अभिजीत कदम, रत्नदीप भोसले यांच्या हस्ते झाले. आयोजन आनंद कंदले यांनी केले. मुंबईचे डॉ. अजित निळे, डॉ. संजय देवरुखकर, डॉ. किरण फुसे, डॉ. महेश जगाडे यांनी तपासणी केली. तेरणा जनसेवा केंदाचे सुजित पाटील, अमीन सय्यद, उत्तम शिंदे, संतोष खोचरे, रवी शिंदे यांनी परिश्रम घेतले.

 
Top