लोहारा/प्रतिनिधी-
सावित्री - जिजाऊ जन्मोत्सव सप्ताहाअंतर्गत लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) व बेलवाडी येथे जिजाऊ ब्रिगेडच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी जिजाऊ - सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा सुनंदा माने, जिल्हा प्रवक्ता रेखाताई सूर्यवंशी, जिल्हा संघटक वंदना भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना रेखा सूर्यवंशी म्हणाल्या की, महिलांनी कोणत्याही कर्मकांडांना बळी न पडता स्वत:मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा आणि सावित्रीमाई आणि जिजाऊंच्या विचारावर चालावे जेणेकरून त्या उद्याची प्रगल्भ वैचारिक पिढी निर्माण करू शकतील. लोहारा तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड च्या माध्यमातून वंदना भगत कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा प्रभाव येथील महिलांमध्ये दिसून येत असल्याचे प्रतिपादन रेखा सूर्यवंशी यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय मुलींनी जिजाऊ गौरव गीत, पोवाडे सादर केले. ग्राम शाखा हिप्परगा येथे अध्यक्ष पदी गीता तुकाराम हराळे यांची तर सुवर्णा योगेश जाधव यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच ग्राम शाखा बेलवाडी येथे अध्यक्षपदी नीता शरद भगत तर अपर्णा लहू जाधव यांची सचिव पदी निवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महिला, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांनी जास्तीत जास्त संख्येने जिजाऊ ब्रिगेड मध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन सुनंदा माने यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी वंदना प्रकाश भगत यांनी आभार मानले.