उस्मानाबाद /प्रतिनिधी-
मांजरी (जि. पुणे) येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार शरदचंद्र पवार यांच्या समक्ष केलेल्या घोषणेनुसार मराठवाड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (स्टडी अॅन्ड रिसर्च सेंटर) उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी उस्मानाबाद जिल्हा योग्य असून जिल्ह्यात ऊसाची उपलब्धता व कारखान्यांची संख्या पाहता उस्मानाबादला हे उपकेंद्र उभारावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा धनेश्वरी शिक्षण समुहाचे प्रमुख डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी उममुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन केली.
उपकेंद्र उभारल्यास जिल्ह्याच्या विकासास हातभार लागेल, रोजगारनिर्मिती होऊन शेतक-यांना ऊस शेेतीसंदर्भात अद्ययावत माहिती मिळण्यास मदत होईल, अशी भूमिका डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मांडली. उपमुख्यमंत्री पवार यांनी डॉ. पाटील यांना जिल्ह्यातील पाण्याची स्थिती व आवश्यक बाबींची विचारपूस केली आणि स्वीय सहाय्यक यांनी यासंबंधी माहिती घेऊन कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. या वेळी डॉ. पाटील यांनी अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल सत्कार केला. याप्रसंगी नंदकुमार गवारे, प्रा. सतीश मातने, ओंकार निंबाळकर हे उपस्थित होते.