परंडा/प्रतिनिधी-
रा.गे.शिंदे महाविद्यालयातील ब्रॉडकास्टिंग अँड जर्नालिजम विभागाने आयोजित केलेली लेन्शेशन कॅमेरा ऑपरेशन अँड हॅण्डलिंग ही कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
या कार्यशाळेत बीड येथील प्रसिद्ध कॅमेरामॅन सचिन नलावडे आणि किरण दळवी यांनी दोन सत्रात विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. कॅमे-याचे कार्य, कॅमेरा वापरण्याची वेगवेगळी तंत्र, कॅमे-यात असणारे वेगवेगळे भाग यासंबंधीचे सखोल मार्गदर्शन किरण दळवी यांनी पहिल्या सत्रात केले. तर दुस-या सत्रात सचिन नलावडे यांनी फोटो जर्नालिजममधे करीअर करताना आपल्यात कोणते गुण आवश्यक आहेत,यासंबंधी मार्गदर्शन केले.प्रत्यक्ष फोटोग्राफी करताना आपल्या हातांचे आणि डोळ्यांचे कार्य कसे हवे यासंबंधीचे मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह यावेळी विद्याथ्र्यांना दाखवून दिले.
कार्यशाळेतील प्रमुख वक्ते नलावडे आणि दळवी यांनी विद्याथ्र्यांच्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा सावळे या होत्या तर व्यासपीठावर बी.व्होक चे नोडल ऑफिसर डॉ.महेशकुमार माने यांची उपस्थिती होती.या कार्यशाळेचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले तर प्रस्ताविक प्रा. सज्जन यादव यांनी केले.या कार्यशाळेत 170 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा.संतोष काळे,डॉ.अक्षय घुमरे यांनी विशेष सहकार्य केले.

 
Top