तुळजापूर/प्रतिनिधी-
सोलापूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित एम.एस.सी.आय.टी. शिष्यवृत्ती लॉन टेनिस स्पर्धेत तुळजापूर शहरातील दोन स्पर्धकांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
लातूर, सोलापूर, उस्मानाबाद या विभागाची लॉन टेनिस स्पर्धा सोलापूर येथे पार पडली. या स्पर्धेत 12 वर्षे वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत प्रियंका किरण हंगरगेकर तर मुलांच्या स्पर्धेत यश सतीश हुंडेकरी यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तुळजापूर सारख्या ग्रामीण भागातून मागील काही काळापासून लॉन टेनिस स्पर्धेत येथील स्पर्धक सातत्याने यश संपादन करत आहेत. या स्पर्धकांच्या यशात प्रशिक्षक संजय नागरे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल प्रियंका हंगरगेकर आणि यश हुंडेकरी यांचे कौतुक होत आहे.

 
Top