
भूम/प्रतिनिधी

महिला गटात प्रथम पारितोषिकसाठी आनंदवन क्रक्रीडा मंडळ गंगाखेड व धस दादा स्पोर्ट क्लब आष्टी यामध्ये लढत होऊन आष्टी संघांनी जबरदस्तीच्या चढाई करीत गंगाखेड संघाला चितपट केले.प्रथम पारितोषिक धस दादा क्रक्रीडा मंडळ यांना देण्यात आले तर द्वितीय पारितोषिक आनंदवन क्रक्रीडा मंडळ गंगाखेड यांना तृतीय पारितोषिक साई स्पोर्ट औरंगाबाद आणि चतुर्थ पारितोषिक समता क्रक्रीडा मंडळ दहिगाव यांना देण्यात आले.
पुरुष गटात प्रथम पारितोषिकसाठी शेवटचा सामना बाबुराव चंदेरे स्पोर्ट क्लब पुणे व एन टी पी सी नंदुरबार यांच्या झाला. या सामन्यात चक्क अटीतटीच्या सामन्यात एक पॉइंट ने बाबुराव चंदेरे स्पोर्ट क्लब ने सामना जिंकला. शांत आणि संयमी खेळ चे प्रदर्शन एनटीपीसी नंदुरबार संघाने दाखवले. प्रथम पारितोषिक बाबुराव चंदेरे स्पोर्ट क्लब मिळाले तर द्वितीय पारितोषिक एनटीपीसी नंदुरबारला मिळाले ,तृतीय पारितोषिक मॉडर्न स्पोर्ट क्लब पुणे व चतुर्थ पारितोषिक सतेज क्रक्रीडा मंडळ पुणे यांनी पटकावले.या सामन्यातील खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी अर्जुन पुरस्कार विजेते कब्बडी पट्टू शांताराम जाधव व भोसले यांनी कार्य केले.
पारितोषिक व रोख रक्कम व ट्रॉफी विजेत्यांना देण्यासाठी जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश भाऊ कांबळे , माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, गेवराईचे नगराध्यक्ष नाना भंडारी, बाळासाहेब क्षीरसागर, सेवादल जिल्हाध्यक्ष विलास शाळू, भाजपा तालुकाध्यक्ष आदम भाई शेख, शिवसेना तालुकाप्रमुख गणेश शेंडगे,कोष्टी परिषद के सचिव उमेश ढगे, टाटा मोटर्स के श्रेणीक गांधी, शैलेश फलके,पार्षद सोपान वरवडे , नगरसेवक उमेश माळी,शिक्षण महर्षी आर. डी. सूळ सर, प्रा. आप्पासाहेब हुंबे, रुपेश शेंडगे आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अशोक मस्कर, अॅड अजित मोटे, अमर सुपेकर नाना बाराते, विनोद गिरी,मुंढे व शिवनेरी क्रक्रीडा मंडळाचे सदस्य यांनी उत्कृष्ट कार्य केले तर सूत्रसंचलन अॅड सिराज मोगल व अलीम सर शेख यांनी केले.