परंडा / प्रतिनिधी -
नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद यांच्या वतीने परंडा येथे फिट इंडिया मोव्हमेंट कार्यक्रम अंतर्गत दि. 18 शनिवार  रोजी सकाळी 9 वाजता मिनी मॅरेथॉन आयोजन करण्यात आले. यामध्ये २१० नागरिकांनी भाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला.
मिनी मॅरेथॉनच्या शुभारंभ प्रसंगी परंडा पोलीस ठाणे परंडा येथील पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद, शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे , डॉ.आनंद मोरे , महावीर तनपुरे, शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयाचे प्रा.डॉ.शहाजी चंदनशिव, प्रा. डॉ. संभाजी गाते, प्रा.डॉ. बी.बी राऊत, प्रा. डॉ .गजेंद्र रंदील, प्रा. डॉ .अरुण खर्डे, प्रा.डॉ. एच.एम. गायकवाड,प्रा. डॉ. सचिन चव्हान, प्रा. सचिन साबळे आदींची उपस्थिती थी ।
या आरोग्यपर जनजागृती कार्यक्रमासाठी शिक्षणमहर्षी गुरुवर्य .रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा, कमांडो करिअर अकॅडमी परंडा , क्रक्रांतीसंगर करिअर  अकॅडमी परंडा ,श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी,तसेच उपजिल्हा रुग्णालय परंडा  इ. सहभागी संस्थेचे  युवक, युवती,शिक्षक, तसेच परंडा शहर नागरिक  सहभागी झाले होते. या  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परंडा तालुका समन्वयक रणजीत पाटील , रामेश्वर चोबे तसेच  सुजित शिंदे,राहुल कडबने इ. परिश्रम घेतले. 
 
Top