उमरगा/प्रतिनिधी-
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधान विचार मंच उमरगाच्या वतीने शहरात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 21 दात्यांनी रक्तदान केले.
जिल्हयातील रक्ताचा तुटवडा विचारात घेऊन व भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधान विचार मंचच्या वतीने उमरगा नगरपरिषद समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी (दि.21) आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन संविधान विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष अशोक बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. य
ावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडीत पुरी, डॉ. यशवंत पाटील, रोटरी क्लबचे सचिव प्रा. युसुफ मुल्ला, बालाजी कुडुंबले, विठ्ठल सुर्यवंशी, पद्माकर घोगे, रफीक शेख, महादेव पाटील, राम राठोड, नितीन कांबळे, गुणवंत गायकवाड, प्रभाकर सुर्यवंशी, दिलीप भोसले, नेताजी जमादार आदी उपस्थित होते.

 
Top