
तालुक्यातील अनसुर्डा येथील पोस्टमन अविनाश पांडुरंग डोके (63) यांचे मेंदूत रक्तस्राव झाल्याने रविवारी दि 19 रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान निधन झाले. त्यांनी पोस्टमन म्हणून 41 वर्षे सेवा केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नातेवाईक , गावातील नागरिक उपस्थित होते.