तेर/प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे दुस-या ते तिस-या शतकातील विटांनी बांधलेल्या तीर्थकुंडाची स्वच्छता करताना दारूच्या रिकाम्या बाटल्या मोठ्या प्रमाणात सापडल्या.      
 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पुरातन दुस-या ते तिस-या शंकातील विटांनी बांधलेले प्राचीन तीर्थकुंड असून या तीर्थकुंडाच्या स्वच्छतेसाठी 8 जानेवारीला  सरपंच नवनाथ नाईकवाडी, संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक अमोल गोटे, किसन काळे, सचिन मुंडे अविनाश राठोड, विलास देशमुख, नरहरी बडवे, अमोल थोडसरे, बापू नाईकवाडी, वैभव डीगे, अशपाक शेख, बाळासाहेब रसाळ, छोटू कोरबू, पांडुरंग भक्ते, अविनाश खांडेकर, विठ्ठल कोकरे, केशव सलगर, माधव मगर यांनी स्वच्छता केली. ही स्वच्छता करीत असताना प्राचीन तीर्थकुंडात दारूच्या रिकाम्या बाटल्या मोठ्या सापडल्या  आहेत. पुरातत्व विभाग व पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक काय कारवाई करणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.  
 
Top