
श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञोत्सवातील सहाव्या माळे दिवशी बुधवार दि.8 रोजी देवी सिंहासनावर भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. प्रारंभी अभिषेक पुजा भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. या पुजेत देवीच्या सिंहासनावर चांदीचीे छञपती शिवाजी महाराज यांची मुर्ती ठेवण्यात येवुन प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी छञपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देत असल्याची पुजा मांडण्यात आली.
हे अविस्मणीय रुप डोळ्यात साठवण्यासाठी शिवप्रेमीसह देविभक्तांनी मोठी गर्दी केली होती. भवानी तलवार अलंकार पुजा वर्षातुन तीन वेळा देविजींज्या सिंहासनावर मांडण्यात येते यात शाकंभरी व शारदीय नवराञ उत्सव व 19 फेब्रुवारी या तीन दिवशी वर्षातुन मांडली जाते. सांयकाळी देविजीस भाविकांचे अभिषेकपुजा करण्यात आल्यानंतर वस्ञोलंकार घालण्यात आले नंतर धुपारती झााली. सायंकाळी मांदीर प्रांगणात छबिना काढण्यात आल्यानंतर प्रक्षाळ पुजा होवुन सहाव्या माळेच्या धार्मिक विधीची सांगता झाली.