उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून तुळजापूर तालुक्यातील चिवरीसह अन्य गावातील बंद केलेला वीज पुरवठा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी हस्तक्षेप केल्यानंतर सुरू करण्यात आला.
चिवरी, उमरगा(चि), शिरगापूर, देवसिंगा नळ, हंगरगा नळ या गावातील वीज पुरवठा 26 डिसेंबरपासून महावितरण अधिकाऱ्यांनी अनधिकृतपणे केला होता. त्यामुळे गावातील विद्यार्थी, वृद्धांसह ग्रामस्थांची गैरसोय होत होती. खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना फोन आल्यामुळे दोघेही चिवरीमध्ये पोहोचले. तत्काळ अधीक्षक अभियंता श्री. पाटील व महावितरणच्या संबंधित सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना बोलावून ग्रामस्थांसमोर पंचनामा करून घेतला व तुळजापूर तालुक्यातील चिवरी, उमरगा(चि), शिरगापूर, देवसिंगा नळ, हंगरगा नळ या गावातील वीज पुरवठा सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

 
Top