
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयी काँग्रेस सेवा दलाच्या पुस्तिकेत घृणास्पद मजकूर प्रसिद्ध झाला आहे, भोपाळच्या अधिवेशनात ही अतिशय गलिच्छ भाषा असलेली ही पुस्तके वितरित केली गेली, या घृणास्पद कृतीच्या विरोधात अ.भा.मराठी साहित्य संमेलनात निषेधाचा ठराव मांडणेबाबत स्वागताध्यक्ष मा.श्री नितीनजी तावडे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे, असेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1938 हे मुंबई येथे पार पडले होते. या संमेलनाचे भाग्य असे की माय मराठीच्या उत्सवाला अध्यक्ष म्हणून जाज्वल्य साहित्य निर्मितीचे अग्निकुंड स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे लाभले,सावरकरांनी मराठी भाषा समृद्ध करणारे विपुल लेखन केले आहे तसेच मराठी भाषा अधिकाधिक शुद्ध असावी यासाठी अनेक नवे शब्द रचना करून मराठी भाषेला आणखी समृद्ध केले आहे. सावरकरांच्या साहित्यिक उपलब्धी बाबत सर्व मराठी भाषिक नागरिक जाणतो.तसेच त्यांच्या साहित्य,गीतसंपदा यावर आजही जीवापाड प्रेम करतो.अशा जाज्वल्य साहित्यिक महानुभावाची निवड 1938 च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून झालेली होती.अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा घोर अपमान करणारी पत्रिका काँग्रेस सेवादलाने नुकतीच प्रकाशित केली आहे,यातील मजकुर पाहून कोणताही मराठी माणूस क्रुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही असे हे किळसवाणे लिखाण आहे. स्वातत्र्यवीर सावरकर हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले व्यक्तिमत्त्व आणि 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे. एका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राहिलेल्या महापुरुषांचा घोर आणि क्रुर अपमान याच काळात व्हावा ही अत्यंत घृणास्पद बाब आहे. त्या अनुषंगाने आपण निषेध करणारा ठराव मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन देताना डॉ.हर्षल डंबळ,डॉ.गोविंद कोकाटे,रामदास कोळगे,ह.भ.प.बाबुराव पुजारी,प्रविण पाठक,महेश वडगावकर,तानाजी पाटील, अॅड. नितीन भोसले, अॅड. महेश निंगोळे, संतोष क्षिरसागर, राहुल काकडे, महेश चांदणे, प्रमोद बचाटे,गौतम ठेले, सिद्धू गोफने, संजय दळवे, रमेशअप्पा रणदिवे, विनायक निंबाळकर, मोहन खापरे, महादेव साळुंके, यश मंजुळे, लिंबराज साळुंके, विनोद रसाळ, योगेश ढोबळे यांच्यासह मोठ्या संख्येने सावरकरप्रेमी नागरिक उपस्थित होते.