उमरगा/प्रतिनिधी-
 पेशव्यांच्या जुलमी राजवटी विरोधात लढा देऊन भीमा कोरेगाव येथे महार वीरांनी क्रक्रांती केली म्हणून एक जानेवारी हा  प्रेरणा दिन आहे.आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाचा इतिहास तरुण पिढीनी जतन करून बदलते राजकिय समीकरणे आणि आपले संघटन मजबूत करून राजकीय संघर्ष करावा.पेशव्यांच्या जुलमी राजवटीला कंटाळून महार वीरांनी भीमा कोरेगाव येथे पराक्रम केला असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते कमलाकर सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
 भिमा - कोरेगाव शौर्य दिनानिमित्त व सुभेदार रामजी आंबेडकर जयंतीनिमित्त बुधवारी  (दि.१) पालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भिमराष्ट्र ग्रुपच्यावतीने विजयी स्तंभाला मान्यवरांच्या उपस्थितीत मानवंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी सूर्यवंशी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भीमराष्ट्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन माने,कवी गुणरत्न भालेराव, मेजर सहदेव कांबळे, मेजर मोहन कांबळे, तानाजी सूर्यवंशी, प्रा इसुफ मुल्ला, संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष प्रदीप भोसले,जी.एल.कांबळे आदींची उपस्थिती होती.
मानव मुक्तीसाठी 1818 मध्ये महार बटालियनने भिमा -कोरेगाव येथे पेशव्यांचा पराभव केला. हा दिवस शौर्य दिन म्हणुन साजरा केला जातो. भिमराष्ट्र ग्रुपने आयोजीत केलेल्या विजय स्तंभास मानवंदना देण्यात आली या वेळी समता सैनिक दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कवी गुणरत्न भालेराव यांनी विजयोत्सव गीत सादर केले.
यावेळी  शाक्यदिप कांबळे यांनी प्रास्ताविक केले. चेतन गायकवाड यांनी सूत्रसंचलन केले. भिमराष्ट्र ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष श्री. माने, प्रकाश कांबळे, मल्हारी सुर्यवंशी, तम्मा सिघमशेट्टी, शिवानंद सुर्यवंशी, सतीश कांबळे, बालाजी सुर्यवंशी, दिपक इंगळे, अविनाश कांबळे, चेतन गायकवाड, विक्रम कांबळे, खंडू कटके,सुशांत कांबळे आदींनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.

 
Top